आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुर्गम भागात राहणारे, हातावर पोट असलेल्या अन् गरजवंतांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेतील नागरिकांच्या क्षुधाशांतीसाठी बोदवड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी हिंगणे येथे बुधवारी ‘एक मूठ धान्य’ संकलनाचा उपक्रम राबवला. सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या या उपक्रमात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गहू, तांदूळ, ज्वारी मिळून एकूण पावणे दोन क्विंटल धान्य संकलित केले. शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवक गरजवंतांपर्यंत पोहोचतील. यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून रासेयो स्वयंसेवकांना किमान एक मूठ धान्य द्यावे अशी संकल्पना आखण्यात आली. शिबिराच्या पाचव्या दिवशी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
सुरुवात हिंगणे गावच्या सरपंच मनीषा पाटील यांच्या घरापासून झाली. त्यांचे सासरे साहेबराव पाटील यांनी रासेयो एककास धान्य देऊन सरुवात केली. नंतर संपूर्ण गावात फिरून विद्यार्थ्यांनी पावणे दोन क्विंटल धान्य जमा केले. त्याचे गरजूंना वाटप होईल. ग्रामस्थ अशोक पाटील, कृष्णा पाटील, राजेंद्र पाटील, भारत पाटील, वैभव पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल बारी, डॉ.माधव वराडे, डॉ. वंदना नंदवे, डॉ. अमर वाघमोडे, अतुल पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी वृषभ बावस्कर, विद्यार्थिनी प्रतिनिधी चंचल बडगुजर, स्वयंसेवक संभाजी टिकारे यांचा सहभाग हाेता.
इतरांना प्रेरणा देण्यासाठी उपक्रम
एक मूठ धान्य संकलनामुळे गरजूंची काही अंशी मदत, तर स्वयंसेवकांना समाजाच्या सेवेचे समाधान मिळेल. समाजातील इतर घटकांना या उपक्रमातून प्रेरणा मिळेल. ते मदतीसाठी पुढे येतील. - प्रा.डॉ.अनिल बारी, शिबिर संयोजक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.