आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीदर्शन:17,505 जि.प. कर्मचाऱ्यांना सातव्या आयाेगाची थकबाकी जूनच्या पगारात; कोरोनाची स्थिती निवळल्याने निवृत्तांना रोखीने मिळेल लाभ

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील थकबाकीच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांसह १७ हजार ५०५ कर्मचाऱ्यांना जुनच्या पगारात ही थकबाकी मिळणार आहे. यासबंधीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. जिल्हा परिषद, अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या पगारात म्हणजेच जुलै महिन्यात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर सेवानिवृत्तांना रोखीने दिली जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी २०१९-२०२०पासून पुढील ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, डिसेंबर २०१९पासून कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि महसूली उत्पादनावर झालेल्या प्रतिकुल परिणामामुळे जुलै २०२०मध्ये वेतन आयोगाच्या दुसऱ्या टप्प्याची थकबाकी १ वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, आता कोरोनाची परिस्थिती निवळली असल्याने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या थकबाकीची प्रतिक्षा लागून होती. महागाई, आजारपणामुळे कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्तीधारकांमधून या रक्कमेची मागणी केली जात आहे. राज्य सरकारी तसेच जिल्हा परिषद आणि पालिका कर्मचाऱ्यांना २०१९पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. २०१९-२०पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात थकबाकी देण्याचा निर्णय झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची ही थकबाकी भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी रोखीने दिली जाते. सातव्या वेतन आयोगाची सुमारे दीडशे कोटींची थकबाकीची रक्कम आहे. या थकबकीचा पहिला हप्ता जुलै २०१९मध्ये मिळाला. दुसरा हप्ता २०२०मध्ये मिळणार होता. मात्र, तो अद्याप मिळाला नाही. शासकीय आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्याने शासकीय कर्मचारी थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते.

बातम्या आणखी आहेत...