आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षाच्या पर्वावर बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याचा आनंद झाला. जन्माची वेळ सांगता येत नाही. बाराचा ठोका चुकला खरा; परंतु नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवा पाहुणा घरी आला. मुलगी असो वा मुलगा बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू अशा भावना १ जानेवारीला जन्माला आलेल्या चिमुकल्यांच्या माता-पितांनी व्यक्त केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शाहू महाराज रुग्णालय येथे १ जानेवारीला १८ बालकांचा जन्म झाला. त्यात नऊ मुली तर नऊ मुलांचा समावेश आहे
नववर्षाच्या पहिल्या दिवशी २४ तासांत सर्वाधिक प्रसूती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाल्या. या ठिकाणी १५ बालकांचा जन्म झाला. त्यात आठ मुली तर सात मुले जन्माला आली. दरम्यान, मुलांच्या बरोबरीनेच मुलींचा जन्मदर असून मुलींच्या जन्माचा दिवस साजरा करू, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. शाहू महाराज रुग्णालयात दिवसभरात तीन बाळांचा जन्म झाला असून, यात एक मुलगी तर दोन मुले जन्माला आली. नववर्षात पहिल्याच दिवशी जन्मलेल्या सर्व बाळांची व त्यांच्या मातांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.
कन्या जन्माचे स्वागत पालकांनी केले पेढे वाटपाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच जन्माला आलेल्या कन्यांचे स्वागत पालकांनी पेढे वाटप करून केले. वंशाचा दिवा दीपक नव्हे तर ज्याेतीही चालेल असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. कन्या जन्माला आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.