आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई करेना:संस्थांसाठी दिलेल्या 185 जागा पडून; वापरच नाही तरीही महापालिका जागा ताब्यात घेण्याची कारवाई करेना

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तत्कालीन नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी २० वर्षांपूर्वी खुले भूखंड खिरापतीसारखे सामाजिक संस्थांना वाटप करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा व्यावसायिक वापर होतो आहे. विकसीत २१३ भूखंडांच्या माध्यमातून या संस्था कोट्यवधींची कमाई करीत आहेत. परंतु केअर टेकर असलेली पालिका १५ ते २० लाखांच्या मालमत्ता करावर समाधानी आहे. १८५ भूखंडांचा वापर होत नसून ते ताब्यात घेण्याचा पालिकेला विसर पडला आहे.

शहरात २० ते २५ वर्षांपूर्वी वेगवेगळ्या भागात मोठमोठे भूखंड होते. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील संस्था, मंडळ व नागरीकांना सामाजिक कार्याच्या नावाने भूखंड वापरास दिले होते.

बातम्या आणखी आहेत...