आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान संत झुलेलाल महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी मथुरा, हरिद्वार येथे भव्य मेळाव्याचे आयाेजन करण्यात येते. यंदा १८ ते २४ मार्च दरम्यान हा भव्य मेळावा हाेणार आहे. या मेळाव्यात देशभरातून भाविक माेठ्या संख्येने सहभागी हाेत असतात. जळगाव जिल्ह्यातून देखील सुमारे ५०० समाजबांधव सहभागी हाेणार आहे. याबाबत अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टचे पदाधिकारी नियाेजन करीत असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त अशाेक मंधान यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा उत्सव देशभरातील सिंधी बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करतात.
मथुरा, हरिद्वार येथे देशभरातून हजारो समाजबांधव या मेळाव्यात येतात. गेल्या ४० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या मेळाव्यास दरवर्षी जळगाव जिल्ह्यातून हजारो समाजबांधव जातात. यंदा देखील सुमारे ५०० समाजबांधव मेळाव्यास सहभागी हाेणार आहे. त्यादृष्टीने अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट हे भाविकांना मार्गदर्शन करीत आहे. तीन महिन्यांपासून भाविकांचे रेल्वे आरक्षण देखील करण्यात आले आहे. अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष दयानंद विसरानी, सदस्य अशोक मंधान, सेक्रेटरी रमेश मतानी, राजू आडवानी, भगत बालाणी, राजू गलानी, हेमू भागवानी आदी पदाधिकाऱ्यांसह पाचशेवर समाजबांधव या मेळाव्यासाठी नियोजन करीत आहेत.
महाेत्सवात हवन, झेंडावंदन, धुनीसाहेब, भोगसाहेब, पालबसाहेब हाेणार
महोत्सवात १८ मार्च शनिवार राेजी मथुरेत हवन, झेंडावंदन, धुनीसाहेब, सत्संग, रविवारी भव्य भोगसाहेब, पालबसाहेब, भव्य शोभायात्रा, मंगळवारी हरिद्वारला पाठसाहब, बुधवारी झेंडावंदन केले जाणार आहे. गुरुवारी चेट्रीचंड उत्सव साजरा करून जयंती ज्योत गंगा घाटात विसर्जित केली जाणार आहे. यासह विविध धार्मिक कार्यक्रम देखील हाेणार आहे. या महाेत्सवासाठी शुक्रवारी सायंकाळी जळगावातील समाजबांधव हे कर्नाटक व सचखंड एक्स्प्रेसने मथुरेकडे रवाना होणार असल्याचे सेक्रेटरी रमेश मतानी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
असा साजरा केला जाताे उत्सव
हरिद्वार येथे भगवान झुलेलाल यांची ज्योत प्रज्वलित करून चेट्रीचंड उत्सवाची सुरुवात होते. हा सिंधी समुदायातील एक प्रमुख उत्सव मानला जातो. आराध्य देवता भगवान झुलेलाल यांचा हा जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान झुलेलाल जलदेवता वरुण आहे. या निमित्त देशभरातून आलेले सिंधी समाजबांधव जीवनात सुख, समृद्धी, वैभव आणि संपन्नतेची प्रार्थना करतात. तसेच वरुण देवतेची पूजा करतात असेही समाजबांधवांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.