आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ व सुंदर शहरासाठी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता रेवदंडाच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात पाच तासांत १९८७ श्री सेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता करत १०३ टन कचरा संकलित केला. संकलित केलेला कचरा नेरीनाक्या परिसरात जमा करण्यात आला आहे. त्याची आव्हाणे येथील डंपिंग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावण्यात आली. अभियानात युवकांचा सहभाग लक्षणीय हाेता. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरासह धरणगाव, जामनेर, एरंडोल येथे हे अभियान राबवण्यात आले. सकाळी ७ वाजेपासूनच श्री सेवक आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी एकत्र आले हाेते.
कचरा उचलण्यासह ट्रॅक्टर व अन्य वाहनात टाकण्यासाठी घमेली, पावडे, ग्लोजही प्रतिष्ठानकडूनच पुरवण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीने कुठलाही आवाज, गोंधळ न करता श्री सेवकांचे कार्य सुरू होते. शहरातील शाळा, महाविद्यालयांतील परिसरासह शासकीय इमारती, सिंधी कॉलनी, शेरा चौक ते लढ्ढा फॉर्म समोरील रस्ता पूर्ण परिसर, कालिका माता मंदिर ते नेरीनाका, महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक व मुख्य बाजारपेठ, जिल्हापेठेतील काही भागात स्वच्छता करण्यात आली. मनपातर्फे कचरा वाहून नेण्यासाठी २५ ट्रॅक्टर व प्रतिष्ठानातील सदस्यांनीचीही १५ छोटी वाहन कार्यरत होती.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात
अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री सुनील महाजन, आरोग्य उपायुक्त उदय पाटील, भरत सपकाळे, भगत बालाणी, मनोज चौधरी यांनी श्रीफळ फोडून केली. नगरसेवक प्रवीण कोल्हे, इब्राहिम मुसा पटेल, नवनाथ दारकुंडे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.
श्री सेवकांची १८ पथके
मोहिमेसाठी १९८७ श्री सेवकांची १८ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात सुमारे ५० स्वयंसेवक सहभागी होते. शहरातील बहुतांश भागात शिस्तीत व शांततेत स्वच्छतेचे कार्य करताना कार्यकर्ते दिसत होते. हातमोजे, गमबूट, मास्क, झाडू आणि इतर साहित्य घेऊन हे कार्यकर्ते मनोभावे सेवा करीत असल्याच चित्र दुपारपर्यंत होते. या कार्यात श्री सेवकांसह मजूर, शेतकरी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.