आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाराेप‎:19 व्या महाराष्ट्र राज्य बाल‎ नाट्य स्पर्धेचा आज समाराेप‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य‎ स्पर्धा गेल्या तीन दिवसांपासून‎ छत्रपती संभाजी महाराज‎ नाट्यगृहात सुरू आहे. यात‎ दररोज सकाळी ११ ते सायंकाळी‎ ६ वाजेपर्यंत विविध बालनाट्य‎ सादर होत आहे. या स्पर्धेच्या‎ अंतिम फेरीत महाराष्ट्रातून विविध‎ केंद्रातून विजेते ठरलेले २३ बाल‎ नाटके सादर होत असून, गुरुवारी‎ ७ नाटके सादर झाली.‎ स्पर्धेत गुरुवारी ‘जाईच्या‎ कळ्या'', ‘हलगी सम्राट'', ‘रेस‎ टू'', ‘या चिमण्यांनो परत फिरा रे'',‎ ‘खिडकी'', ‘इस्कोट'' व ‘राखेतून‎ उडाला मोर'' ही सात बाल नाटके‎ झाली. यात हलगी सम्राटने‎ धम्माल केली.

दरम्यान, शुक्रवारी‎ या बालनाट्य स्पर्धेचा अंतिम‎ फेरीचा शेवटचा दिवस आहे. यात‎ सकाळी ११ वाजता ‘आम्ही ध्रुव‎ उद्याचे'', दुपारी १२.१५ वाजता‎ ‘शिमी'', दुपारी १.३० वाजता‎ ‘माकड चाळे'', दुपारी २.४५‎ वाजता ‘बळी'', दुपारी ४ वाजता‎ ‘वारी'', सायंकाळी ५.३० वाजता‎ ‘इथे भुते राहतात'' हे नाटक सादर‎ करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...