आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:एसटी वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार; लिपिकावर गुन्हा नाेंद

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या जळगाव वर्कशॉपसाठी ट्रान्सपोर्टमधून साहित्य सोडवण्यासाठी घेतलेल्या अग्रीम रकमेचे समायोजन न करता अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव बस आगाराचे नेरीनाका येथे एसटी वर्कशॉप विभागीय भांडार आहे. या ठिकाणी बसेस दुरुस्तीसह इतर साहित्य ठेवले जातात.

या ठिकाणी हेमराज युवराज पाटील (रा. चिंचोली, ता. यावल) हे लिपिक म्हणून काम करतात. १५ मार्च २०१९ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान हेमराज पाटील यांनी वेळोवेळी ट्रान्सपोर्टमधून विविध साहित्य सोडवण्यासाठी १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची अग्रीम रक्कम उचलली.

या रकमेचे समायोजन न करता त्याचा अपहर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भांडाराचे विभागाचे अधिकारी विशाल बळीराम राखुंडे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...