आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट या अवसायनातील पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परताव्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार मार्च ते जून या कालावधीत २५ लाखांपर्यंतच्या ठेवींची २० टक्के रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिली आहे.
बीएचआर पतसंस्थेने ठेवीदारांना केवायसी जमा करण्याचे आवाहन केलेले होते. ही संस्था अवसायनात असल्याने मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट २००२चे कलम ९०नुसार ठेवीदारांना प्रथमत: संस्थेकडे ठेव रकमेची मागणी करणे आवश्यक आहे. संस्थेतर्फे कायद्यानुसार प्राधान्य क्रमाने ठेवी परताव्याचे कामकाज करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना ठेव रकमेपैकी प्रथम टप्पा प्रो-रेटनुसार २० टक्के रकमेचे वाटप सुरू आहे. वैद्यकीय, ज्येष्ठ नागरिक, लग्नकार्य, शैक्षणिक, ग्राहक मंच आदेशानुसार अशा व्यक्तींना त्यांच्या ठेव रकमेच्या व संस्थेच्या नियमानुसार परतावा देणे सुरू आहे. ठेवीदारांनी मूळ ठेव पावती व क्लेम फाॅर्म संस्थेत जमा केल्यास त्यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे ठेवीच्या मूळ रकमेपैकी प्रथम टप्पा २० टक्के रक्कम दिली जाते आहे. अद्यापही बहुतांश ठेवीदारांनी त्यांच्या केवायसी संस्थेत जमा केलेली नाही. केवायसी फॉर्म जमा न करणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी परताव्याबाबत निर्णय घेता येणार नाही.
ज्या ठेवीदारांनी ३ लाख रुपयांपर्यंतच्या मूळ बीएचआरच्या २५ लाखांपर्यंतच्या २०% ठेवी...
पावती व क्लेम फॉर्म भरून संस्थेत जमा केलेले आहेत. संस्थेने ठेवींची रक्कम एनइएफटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहे. मागील अवसायकांच्या काळात १ लाख रुपयांपर्यंत टप्प्याचे वाटप सुरू केलेले होते. त्यानुसार अद्यापही बऱ्याच ठेवीदारांनी त्यांचे क्लेम फॉर्म भरून संस्थेत जमा केलेले नाहीत. ज्यांनी फॉर्म जमा केलेले आहेत. ते ठेवीदार रक्कम मिळण्यासाठी वारंवार विचारपूस करीत आहेत. त्यांना ठेवी मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. संस्थेत पूर्वी अडीच हजार कर्मचारी काम करीत होते. संस्था अडचणीत आल्याने कर्मचारी कमी करून आता फक्त ३५ कर्मचारी काम करीत आहेत.
असे आहे ठेवी परताव्याचे धोरण : मागील अवसायकांच्या कार्यकाळात ठेवीदारांना काही अंशत: रक्कम अदा करण्यात आलेली आहे. संस्थेने मार्च २०२२ या महिन्यात ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना त्यांची २० टक्के रक्कम देण्यासाठी अर्ज मागवले आहेत. एप्रिल महिन्यात ५ ते १० लाख, मे महिन्यात १० लाख ते २५ लाख व जून महिन्यात २५ लाख ते पुढे सर्व रकमांना २० टक्के रक्कम अदा करण्याचे धोरण ठरवलेले आहे. जुलैपासून २० टक्क्यांच्या पुढील टप्प्याचे वाटप तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दरमहा सर्व ठेवीदारांना करण्याचे नियोजन करण्यास आलेले आहे. ही संस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी व त्यावरील ६ नोव्हेंबर २०१५ पर्यंतचे व्याज देण्यास बांधील असल्याचे अवसायक नासरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.