आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका असाे की शासनाच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत मूलभूत सेवांच्या नियाेजनामुळे चर्चेत आलेल्या प्रभाग १०मधील ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी विशेष कमाल केली आहे. हे कॅमेरेच पाेलिसांचे डाेळे बनले आहेत. प्रमुख १२ चाैकांसह ७२ रस्त्यांवरील बारीक हालचाली टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे साडेचार वर्षांत २०० पेक्षा जास्त गुन्हे उघड झाले आहेत. प्रभाग क्र. १० अर्थात पिंप्राळा परिसरात २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी सगळ्यात आधी स्वखर्चाने केलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियाेजन प्रभागाच्या सक्षम सुरक्षेसाठी माेठी भिंत ठरली आहे. सुरुवातीला प्रभागातील गल्लाेगल्ली हाेणारी साफसफाई व विकासाच्या कामांवर बसल्या जागी लक्ष ठेवण्याच्या हेतूने लावलेले ३६ कॅमेरे कालांतराने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले. हुडकाे, खंडेरावनगरातील वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयाेग हाेताे आहे.
२० हजार मीटर केबलचे प्रभागात जाळे रस्त्यांवरील बारीक सारीक हालचाली टिपल्या जात आहेत. यात १२ प्रमुख चाैक, ७२ रस्त्यांवर चाेवीस तास येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चित्रण हाेत आहे. पाच दिवसांपर्यंत प्रत्येक क्षणाची नाेंद ठेवली जात आहे. यासाठी १० हजार मीटर लांबीची फायर ऑप्टिकल केबल तसेच १० हजार मीटर लांबीची इलेक्ट्रिक केबल प्रभागात अंथरण्यात आली आहे. १०० फुटांपर्यंतचे चित्रण क्षमता असलेले ३६ एचडी कॅमरे लावले आहेत.
शेकडाे घटनांचा झाला उलगडा प्रभाग क्रमांक १० मधील सुमारे ६५ ते ७० टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून व्यापण्यात आला आहे. यासाठी दहमहा पाच हजार रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च हाेत असताे; परंतु यामुळे प्रभागातील अतिसंवेदनशील भागात शांतता प्रस्थापित करण्यात माेठ्या प्रमाणात यश आल्याचा दावा उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी केला आहे. हुडकाे व आझादनगर चाैकात झालेल्या दंगलीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या फुटेजचा फायदा झाला हाेता. रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या आराेपींना पकडण्यासाठी रेल्वे पाेलिसांना इथले फुटेज उपयाेगी ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.