आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कंपन्यांमध्ये निवड:कॅम्पस प्लेसमेंटमधून २०० विद्यार्थ्यांना मिळाला राेजगार

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या राहुल खरात या विद्यार्थ्यास तारापूर येथील न्युक्लियर पॉवर कॉर्पोेरेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीत वार्षिक १७ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये अंतिम वर्षातील सुमारे २०० विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. संगणक विभागाच्या पाहुल पोंडे यास आठ लाख, ऋषीकेश रासने व पीयूष टंक यांना साडेसात लाख, उपकरण विभागाचे हेमलता मावळे, अभिलेख पडोले, अनिकेत पाटील, एकता खरवे यांना प्रत्येकी सहा लाखांचे पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे त्यांना चांगली राेजगाराची संधी मिळाल्याने त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गाैरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...