आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात 2015 च्या गाड्या चोरीला:शहरातून 4 दूचाकी लंपास; सीडी, सीएस सीके सिरीजच्या गाड्यांना चोरांकडून पसंती

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दूचाकी चाेरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. दिवसाआड माेटारसायकली गायब हाेत आहेत. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून माेटारसायकली चाेरीला जात आहेत. साेमवारी शहरात चार माेटारसायकली चाेरीस गेल्याबाबत तक्रारी दाखल झाल्यात.यात तीन सायकली या 2015 वर्षी घेतलेल्या आहेत. तर एक 2012 या वर्षीची आहे. म्हणजे 2012 ते 2015 च्या वर्षी खरेदी केलेल्या वाहनांना चाेरटे पसंती देत असल्याची बाब समाेर येत आहे.

साेमवारी शहरातील तीन पाेलिस ठाण्यात चार दूचाकी चाेरीचे गुन्हे दाखल झालेत. यात शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून दाेन, तर एमआयडीसी व जिल्हा पेठ पाेलिस स्टेशनच्या द्ददीतून प्रत्येकी एक -एक माेटारसायकल चाेरीला गेली आहे.

एमआयडीसीतील अजिंठा चाैफुली जवळील बाफना कंपनीसमाेरून वैभव हरीदास निंबाळकर (रा. सिटी काॅलनी, कानळदा राेड, शिवाजीनगर) यांची 25 हजार रुपये किंमतीची एमएच सीएस 4071 ही दूचाकी चाेरीस गेली. ही माेटारसायकल 6 राेजी दुपारी सव्वा दाेन ते रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान लंपास झाली. जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून शिवकाॅलनी स्टाॅफसमाेरील देशी दारूच्या दुकानासमाेरून सम्राट जहांगिर तायडे ( वय 52, रा. दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडकाे) यांची एमएच 19 सीडी 4863 क्रमांकाची माेटाारसायकल साेमवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान चाेरीस गेली.

शहर हद्दीतून दाेन माेटारसायकली लंपास...

शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून दाेन माेटार सायकली चाेरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे दाेन्ही दूचाकी गाेलाणी मार्केट परिसरातून चाेरीला गेल्यात. मेहरुण मधील दत्त मंदिराजवळ राहणार तुळजानंद रावण खैरनार यांनी 8 राेजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान गाेलाणी मार्केटला कामा निमित्त आले असता एमएच 19 सीके 4705 ही दूचाकी पार्किंगमध्ये लावली हाेती. ती चाेरट्यांनी लंपास केली. तर दुसरी दुचाकी साेमवारी रात्री 8 ते साडेआठ वाजेच्या दरम्यान लंपास झाली आहे. श्रध्दा काॅलनीत राहणारे हजारीलाल बाबुलाल सैनी या तरुणाची एमएच 19 बीएच 0114 ही माेटारसायकल चाेरीला गेली आहे. यातील तीन दुचाकी या 2015 या वर्षी आरटीआेत नाेंदविल्या गेल्या आहेत. तर एक त्या अगाेदर 2012 मध्ये नाेंदविलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...