आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:‘बीएचआर’कडून 21 लाख वसूल करा ; ग्राहक तक्रार निवारण आयाेगाचा निकाल

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम जिल्ह्यातील ठेवीदाराचे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीत ठेवलेले २१ लाख ५९ हजार ३१६ रुपये मुदतीत परत मिळाले नाही. या संदर्भात ठेवीदाराने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली होती. बीएचआरकडून हे पैसे शेतसारा पद्धतीने वसूल करावे. अन्यथा, बीएचआरचे बँकेतील खाते गोठवावे असा निकाल देण्यात आला आहे.

घटना अशी की, कमलाकर बालाजी ढवळे (रा. मालेगाव, जि. वाशिम) यांनी सन २०१५मध्ये बीएचआरकडे दोनवेळा करुन २ लाख ५९ हजार ३१६ रुपयांची ठेव ठेवली होती. मुदत संपल्यानंतर देखील त्यांना पैसे परत मिळत नसल्याने अखेर त्यांनी वाशिमच्या ग्राहक तक्रार निवारण आयाेगात दाद मागीतली. सुनावणी अंती ढवळे यांना पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले होते. दरम्यान, अद्याप पैसे परत न मिळाल्याने ढवळे यांच्या वतीने अॅड. राजेश उपाध्याय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करुन हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्याकडून वसुली करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. त्या अनुशंगाने आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील प्रकरण १च्या कमल २२१ नुसार थकीत रक्कम शेतसारा वसुली पद्धतीने वसूल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. पैसे परत न केल्यास बीएचआरचे खाते गोठवावे असे आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...