आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारथ चौक परिसरातील उमाळेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर मंगळवारपासून तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्त गुरुवारी महाभंडाऱ्याचे आयाेजन करण्यात आले आहे. यासाठी एका दानशूर भाविकाने नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर २१०० किलाे गव्हासह ( २१ पोते) संपूर्ण महाभंडाऱ्याचा खर्च उचलला आहे. पूजापाठसह अन्य खर्च हा लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी तरुण कुढापा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. रथ चौक परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीपासून स्थापन असलेल्या उमाळेश्वर महादेव मंदिरामध्ये रथ चाैकातील उमाळेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी पूजा करताना भाविक.
तरुण कुढापा मंडळाचे नियाेजन अन्नदानात वरण-बट्टी, वांग्याची भाजी, शिरा या पदार्थांचा समावेश आहे. प्रभागातील १६ हजारांपेक्षा अधिक भाविकांसाठी महाप्रसाद बनवला जाणार आहे. या उत्सवासाचे नियाेजन तरुण कुढापा मंडळाचे हितेश वाणी, शंभू भावसार, बाळू चौधरी, शिवाजी पाटील, चेतन मराठे, मुन्ना परदेशी, बापू मराठे व इतर पदाधिकारी, सदस्य करीत आहे.
होम हवनासाठी १८० प्रकारच्या वनस्पतींची आहुती मार्बल, टाइल्स लावून जीर्णोद्धार करण्यात आला होता. हे काम पूर्ण होताच मंगळवारी प्राणप्रतिष्ठा उत्सवास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दशविधी स्थान, प्रधान संकल्प, अभिषेकासह विविध विधी करण्यात आले. बुधवारी महायज्ञ, देवप्रतिष्ठा व धान्य अधिवास होईल. गुरुवारी प्रजासत्ताक दिनी कळस स्थान, देवता स्थापना त्यानंतर परिसरातून शोभायात्रेनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिरात शिवलिंगासह शिव-पार्वती, गणपती, महारुद्र, नंदी आदींच्या आकर्षक मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.