आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ विभागाला फटका:रक्षाबंधन ताेंडावर असताना २२ रेल्वे गाड्या केल्या रद्द

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीच अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. इतकेच नाही तर काही गाड्यांना नो-रूम आहे. त्यातच आता नागपूर विभागाने ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान २२ रेल्वेगाड्या रद्द केल्या. स्टील साइडिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रक्षाबंधन ताेंडावर असताना रेल्वे विभागाने ब्लाॅक घेतल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेईल.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागाचे स्टील साइडिंग चालू करण्यासाठी स्टेशनच्या पॅनलचे यार्ड संशोधन आणि बदल रद्द करण्यासाठी रेल्वेने ब्लाॅक घेतला. परिणामी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात नाॅन इंटरलाॅकिंगचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. परिणामी या कामामुळे ८ ऑगस्टपासून रेल्वे प्रशासनाने हा ब्लाॅक घेतला. भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...