आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गाेवर साथीचा शिरकाव झालेला असून महापालिका हद्दीत साेमवारी नव्याने तीन संशयित आढळले आहेत. त्यामुळे संशयितांची संख्या १७२ एवढा झाली आहे. अद्याप ५५ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. गाेवर बाधितांची संख्या १२ एवढी आहे. पालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या विशेष लसीकरणासाठी १६ केंद्र कार्यान्वित केले असून, पहिल्या दिवशी यात २२२ बालकांना नियमित प्रतिबंधात्मक डाेस तर ११ बालकांना अतिरिक्त डाेस देण्यात आले.आतापर्यंत ५०४ बालकांना लसीकरण झाले. विशेष लसीकरण माेहिम १५ ते २५ डिसेंबरदरम्यान राबवणार आहे.
आज या केंद्रांवर मिळेल लस : पालिकेच्या आराेग्य विभागातर्फे साेमवारी १६ केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली. मंगळवारी डाॅ. वाणी दवाखाना (दादावाडी), कांचननगर (बालवाडी) माऊलीनगर (जुना खेडी राेड), बाेहरा मशीद (मासूमवाडी), एकता हाॅल (नशेमन काॅलनी) व साईबाबा मंदिर (सेन्ट जाेसेफ शाळेजवळ) या ६ केंद्रांवरच ही लस उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.