23 वर्षी तरुणीचा झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न, नागरीक आणि पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव


  • तरुणीची ओढणी अडकून फास लागू शकला नाही

प्रतिनिधी

Mar 25,2020 07:37:26 PM IST

नवापूर- तालुक्यातील नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ 23 वर्षी तरुणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चिंचेच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यात तिचा पाय झाडाला लागल्याने फाशी लागताना वाचली. त्यानंतर तात्काळ परिसरातील नागरिक पोलिसांनी तरुणीला झाडावरून खाली उतरवले.


पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रागाचा भरात तरुणीने नवापूर तालुक्यातील जामतलाव तेथून नवापूरकडे जात असतांना रस्त्यावरील चिंचेच्या झाडावर चढून ओढणीच्या सहाय्याने फास लावून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. यात ओढणी कचल्याने झाडाच्या खोडाला पाय लागला आणि अर्धवट गळफास अवस्थेत पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पिंपळनेर चौफलीवर बंदोबस्त करण्यासाठी असलेले पोलिस घटनास्थळी जाऊन मुलीला झाडावरून उतरवून पोलिस वाहनातून नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी यांनी मुलीचा जबाब घेतला आहे.

X