आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार:अंजनी प्रकल्पासाठी २३२ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी

एरंडोल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी, सुमारे २३२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे, प्रकल्पाची सिंचन क्षमता पूर्ण होऊन, सुमारे २८३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अंजनी मध्यम प्रकल्पाच्या वाढीव उंचीसह काम २००८ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, प्रकल्पाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न केले. प्रकल्पाच्या कामासाठी २३१ कोटी ८२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...