आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन गटात स्पर्धा:केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या चित्रकला स्पर्धेत 239 विद्यार्थी सहभागी

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा सोमवारी घेण्यात आली. यात २३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.प्राथमिक गट, माध्यमिक गट व महाविद्यालयीन खुला गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.

प्राथमिक गटात १०३ विद्यार्थ्यांनी, माध्यमिक गटात १०४ तर महाविद्यालयीन खुल्या गटात ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माध्यमिक गटासाठी विषय भारताची राष्ट्रीय प्रतीके हा देण्यात आला होता. महाविद्यालयीन खुल्या गटासाठी तीन विषय देण्यात आले होते. यात जरा याद उन्हे भी करलो, स्वातंत्र्य संग्रामात खान्देशातील क्रांतिकारकांचे योगदान, स्वर्णीम युगाकडे भारताची वाटचाल हे विषय होते. स्पर्धेत प्राथमिक गटात जी. पी. व्ही. पी. प्राथमिक शाळेचा कार्तिक मोरे, माध्यमिक गटात ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील देवदत्त जोशी तर महाविद्यालयीन गटात ओजस्विनी महाविद्यालयातील गायत्री कुमावत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी प्राध्यापक उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...