आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल २३२.७ मिलिमीटर पाऊस:यंदा धरणांतील साठा २४% जास्त; गेल्या वर्षीच्या तुलनेत १०% अधिक पाऊस

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात तब्बल २३२.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर धरणसाठाही तब्बल ५९.६१ टक्यांवर पाेहचला आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत पाऊस अवघा ४१.४ टक्के तर धरणसाठा केवळ ३५.९५ टक्केच हाेता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस १० टक्यांनी तर जलसाठा २४ टक्यांनी अधिक आहे.

यंदा जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात सरासरी ओलांडली आहे. जुलै सरासरी १७७ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असतांना प्रत्यक्षात २३२.९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतचे एकूण पर्जन्यमान ३२२.७ मिमीवर पाेहचले आहे. जुलै अखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर या दाेन महिन्यात ५० टक्के पाऊस झाल्यास वार्षिक सरासरी पूर्ण हाेईल.

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात साठा वाढू शकताे
गेल्या वर्षी १ ऑगस्ट राेजी जिल्ह्यात जलसाठा ३५.९५ टक्के एेवढाच हाेता. या वर्षी मात्र जलसाठ्याची टक्केवारी ५९.६१ टक्यावर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक पर्जन्यमान असल्याने जलसाठाही २४ टक्यांनी अधिक आहे. यात सर्वाधिक साठा गिरणा प्रकल्पाचा आहे. गिरणा, वाघूर आणि हतनूर या तीन प्रकल्पांमध्ये ६६.९२ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ५२.७८ टक्के आणि ९६ लघु प्रकल्पांमध्ये २८.४५ टक्के जलसाठा झाला. ऑगस्टमध्ये त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...