आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री सूर्यकिरण फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशनतर्फे जुना खेडी रोड, ज्ञानदेवनगरात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात ६५० नागरिकांच्या तपासणीत २५ रुग्ण हे कॅन्सरचे आढळले असून यातील तीन रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी फांउडेशनने घेतली आहे. दरम्यान, शिबिरात ११ जणांनी रक्तदान केले तर २५० जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
शिबिरात रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान व रक्तगट तपासणी, रक्ताचे प्रमाण तपासणी, कॅन्सर हॉस्पिटल (नाशिक)तर्फे कर्करोग निदान व मार्गदर्शन तसेच आर. एल. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह व जनरल तपासणी तर जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्र विभागातर्फे मोतीबिंदू तपासणी, निमजाई फाउंडेशनतर्फे स्वयंरोजगार मार्गदर्शन, वायआरजी केअर संस्थेतर्फे कोरोना लसीकरण बूस्टर डोस अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार सुरेश भाेळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी जि.प. सदस्य प्रताप पाटील, अमोल कोल्हे, बंटी भारंबे उपस्थित होते. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, श्री सूर्यकिरण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धांडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.