आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • 250 Members Of 25 Mandals Of Sanskar Parivar Performed Dances; Shivtandava, A Dance Praise Of Radha Krishna Attracted Attention| Marathi News

राधा अष्टमी उत्सव:संस्कार परिवारातील २५ मंडळांच्या २५० सदस्यांचा नृत्याविष्कार रंगला; ​​​​​​​शिवतांडव, राधा-कृष्णाच्या नृत्य स्तुतीने वेधले लक्ष

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार परिवारातर्फे ‘एक गाव एक उत्सव’ कार्यक्रमांतर्गत रविवारी दुपारी ३ वाजता रिंगरोडवरील महेश प्रगती मंडळात ‘राधा अष्टमी’ उत्सव साजरा करण्यात आला. संस्कार परिवारातर्फे गेल्या आठ वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जाताे आहे. त्यात शहरातील २५ मंडळांतील चारशेहून अधिक सदस्य एकत्र येतात. नृत्य स्तुतीत २५०पेक्षा अधिक सदस्यांकडून विविध प्रकारच्या नृत्यातून राधा-कृष्णासह ब्रह्मा, विष्णू व महेश यांची स्तुती केली जाते.

नृत्याविष्कारात १५ ते २५ वयोगटातील महिलांनी विविध गाण्यांतून राधा-कृष्णाची स्तुती केली. या कार्यक्रमात नव्या व जुन्या अशा दोन पिढ्यांकडून योगदान देण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे युवा पिढीत जागरूकता आणण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या आठ वर्षांपासून घेण्यात येत असल्याचे संस्कार परिवारातर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमात सर्व महिला व मुलींनी आपल्या नृत्यातून राधा-कृष्णाचा जीवनपट उलगडला. या नृत्याविष्कारासाठी रंगमंचीय कसब पणाला लावण्यात आले हाेते. स्पाॅट लाइटचे तंत्र त्यासाठी वापरलेले हाेते. म्हणून रंगसंगती लक्षवेधी ठरली. यशस्वितेसाठी परिवाराच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.

राधा जन्माेत्सव साेहळ्याने आणली रंगत
विविध वयाेगटातील महिला-मुलींनी कार्यक्रम सादर केले. राधा-कृष्णाची विविध प्रकारची नृत्य सादर करण्यात आली. त्यात राधा-कृष्ण, ब्रह्मा, विष्णू व महेश यांची स्तुती करण्यात आली. शिवतांडव नृत्य, श्लोक असे नानाविध प्रकार नृत्यातून सादर करण्यात आले. या निमित्ताने राधा मातेचा जन्म हा उत्सव लक्ष्यवेधी ठरला. कार्यक्रमात राधा-कृष्ण स्तुती, शिवतांडव, गांधर्व मन्यांचे आगमन अधिक भावले.

बातम्या आणखी आहेत...