आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्सेसला मान्यता:255 डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेसला मान्यता

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्या शाखांसाठी विद्यार्थ्यांना स्वयंराेजगार, व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शक ठरतील अशा २५५ डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मान्यता दिली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील ४९ महाविद्यालयांनी हे कार्स सुरू करण्याची परवानगी घेतली आहे. यात जळगाव जिल्ह्यात २९, धुळ्यात १२ तर नंदुरबार जिल्ह्यातील ८ महाविद्यालयांचा समावेश आहे.विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट विषयात रुची असल्यास त्याचे सखोल ज्ञान घेणे, अभ्यासक्रमास पूरक ठरेल अशा विषयात निष्णात होण्यासाठी हे कोर्स उपयोगी ठरणार आहे.

सध्याच्या युगातील रोजगार निर्मिती हा मोठा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून हे काेर्स तयार करण्यात आले आहेत. यात कला, वाणिज्य, विज्ञानसह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पूरक ठरणारे विषय आहे. विद्यापीठाने मान्यता दिल्यामुळे संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती, महाविद्यालय व कोर्सची नावे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहेत.

असे आहेत काही निवडक महत्त्वाचे कोर्स
इलेक्ट्राॅनिक्स इक्वीपमेंट मेंटेनेन्स, वेब डिझायनिंग, व्हॅल्यू अॅडिशन टू अॅग्रो वेस्ट, अॅनिमेशन, हॉर्टिकल्चर टेक्नॉलॉजी, सायबर लॉ, टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट, टेक्स्टाइल्स केमिस्ट्री, टॅली वीथ जीएसटी, चाइल्ड राइटस्, चाइल्ड काैन्सिलिंग, ब्यूटी थेरेपी अॅण्ड हेअर ड्रेसिंग, बिग डेट अॅनालिसीस, फॉरेन्सिक सायन्स, फूट स्टॅक डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट अॅण्ड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, वॉटर अॅनालिसीस, ड्रामेटिक, मॅथेमॅटिक्स इन इकॉमॉनी, बी किपिंग, स्टॉक अॅण्ड कमोडिटी मार्केट, म्युच्युअल फंड अॅण्ड शेअर मार्केट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, लॅन्ड सर्व्हेयिंग.

बातम्या आणखी आहेत...