आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्ती (दंड) माफीसाठी आता अभय याेजनेंतर्गत शेवटचे दाेन दिवस शिल्लक आहेत. थकबाकीदारांच्या विरूद्ध कारवाईचा इशारा दिल्यानंतर भरणा करण्यासाठी गर्दी वाढली आहे. दरम्यान, साेमवारी तीन लाख १५ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकास अभय याेजनेत तब्बल २८ हजार ९०४ रूपयांची सूट देण्यात आली. बड्या थकबाकीदारांना करात सूट मिळवण्याची शेवटची संधी असल्याने महापालिकेच्या घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांकडून संपर्क माेहिम राबवण्यात आली आहे.
प्रभाग समिती क्रमांक २ मधील वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये ही भरघाेस सूट दिल्यानंतर हा विषय चर्चेचा ठरला. मनपाने राबवलेल्या अभय याेजनेंतर्गत जुनी थकबाकी असलेल्या ज्या थकबाकीदारांनी लाभ घेतलेला नाही. त्यांची आता यादी तयार करण्यात येणार आहे. वारंवार सांगूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची नावे चाैकातील फलकावर लावण्यात येणार आहेत. तरीही थकबाकीची रक्कम भरली नाही तर जप्तीची कारवाईला सामाेरे जावे लागेल. तशी वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.