आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी परत गेल्याचा परिणाम,:शहरातील 29 काेटींची कामे थांबली; ​​​​​​​ मनपाकडून दाेन महिन्यांपासून प्रयत्न सुरू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या डीपीसी निधीतून हाेणाऱ्या कामांचा खाेळंबा झाला आहे. ४३ काेटींच्या निधीपैकी १५ काेटींचा निधी प्राप्त झाला हाेता; परंतु मुदतीत खर्च न झाल्याने ८ काेटींचा निधी परत गेला आहे. त्यामुळे मक्तेदारांनी कामे अर्ध्यांत साेडली असून शहरातील रस्ते व गटारींच्या कामांना विलंब हाेत आहे. मनपाकडून दाेन महिन्यांपासून निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी दलितेत्तर याेजनेतून २० काेटी ५२ लाखांच्या निधीला तर नगराेत्थान याेजनेतून २२ काेटी ८३ लाख निधीला प्रशासकीय मान्यता दिली हाेती. त्यापैकी दाेन्ही याेजनांमधून १५ काेटींचा निधी प्राप्त झाला हाेता. ३१ मार्च २०२२ पर्यंत सात काेटींचा निधी खर्च झाला हाेता.

उर्वरित निधीतून कामे सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी अखर्चीत निधी परत करण्याचे आदेश दिल्याने या दाेन्ही याेजनांमधील ६ काेटींचा निधी परत गेल्याने आर्थिक काेंडी झाली आहे. मनपा सूत्रांनुसार पालकमंत्र्यांनी डीपीसीमधून ४३ काेटींच्या निधीला मंजुरी दिली हाेती. प्रशासनाकडून या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देखिल मिळाली; परंतु मनपाला १५ काेटी ५ लाखांचा निधी प्राप्त झाला हाेता. अद्यापही २४ काेटी ८५ लाख रूपयांच्या निधीची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत प्राप्त निधीतून ७ काेटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

मक्तेदारांची आठ काेटी रुपयांची बिले आहेत थकीत
दलितेतर व नगराेत्थान याेजनेत्या १३४ कामांपैकी बरीच कामे पूर्ण झाली. मात्र जी कामे सुरू हाेती त्याचा निधीच परत गेल्यामुळे मक्तेदारांनी कामे अपूर्ण साेडली. एकीकडे कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांना त्रासाला सामाेरे जावे लागत आहेत. मक्तेदारांची आठ काेटींची बिले थकल्याने त्यासाठी बांधकाम विभागाकडे तगादा लावला जात आहे. बिल मिळत नाही ताेपर्यंत उर्वरित मंजूर असलेल्या २९ काेटींच्या कामांचा मार्ग माेकळा हाेणार नाही.

बातम्या आणखी आहेत...