आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदी सुरू:ज्वारीला 2970 रुपये प्रती क्विंटल भाव‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत‎ किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप‎ हंगामातील भरडधान्य हमीभावात‎ खरेदी करण्यासाठी, खरेदी केंद्राचा‎ शुभारंभ ४ रोजी सकाळी झाला.‎ अमळनेर येथील कृषी उत्पन्न‎ बाजार समिती मधील मार्केटिंग‎ फेडरेशनच्या गोदामात भरडधान्य‎ खरेदी सुरू आहे.

तहसील‎ कार्यालयाचे गोडाऊन व्यवस्थापक‎ अनिल पाटील यांच्या हस्ते‎ काटापूजन करण्यात आले. खरेदी‎ केंद्रावर ज्वारीला २९७० रुपये‎ प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला‎ आहे. २३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली‎ आहे. हमीभावात भरडधान्य विक्री‎ करण्यासाठी हेक्टरी २१ क्विंटलची‎ मर्यादा शेतकऱ्यांना घालून दिली.‎

बातम्या आणखी आहेत...