आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात केवळ अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसरे मंदिर जळगावात निमखेडी रस्त्यालगतच्या तपोवनात गेल्या दोन महिन्यांत उभारण्यात आले आहे. हे मंदिर उज्जैन, अमळनेरनंतर देशातील तिसरे मंदिर ठरले आहे. त्याशिवाय तपोवनात भक्तांनी दिलेल्या देणगीतून बारा ज्योतिर्लिंगांसह पंधरा देवी-देवतांचीही मंदिरे उभारण्यात आली आहेत. वर्षभरात परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराचा सन १९३३मध्ये जीर्णोद्धार झालेला आहे. मंगळदोष निवारणासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. देशात मंगळ ग्रहाची मोजकीच मंदिरे आहेत. उज्जैन येथे मंगलनाथ मंदिर आहे. महाराष्ट्रात अमळनेरनंतर जळगाव शहरातील निमखेडी रस्त्यालगतच्या तपाेवनात मंगळ ग्रह मंदिराचे निर्माण झाले आहे. बद्रीनाथ येथील दिगंबर आखाड्याचे महंत सर्जुदास महाराज यांच्या पुढाकाराने मंगळ ग्रह मंदिराचे निर्माण झाले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते महाराष्ट्रात आहे.
जळगाव शहरातील महामार्गावरील खाेटेनगर स्टाॅपपासून तालुका पाेलिस स्टेशन मार्गे चंदूअण्णानगर येथे यावे लागते. तेथून आव्हाणे रस्त्यावरील इंडेन गॅस गाेडाऊनकडून संत सावतानगर पुढे गेल्यानंतर जळगाव-सुरत रेल्वेलाइनलगत श्री हनुमान तपोवन धाममध्ये मंगळ ग्रह मंदिर आहे. इन्सेट : मूर्ती.
तपाेवनात सुमारे तीन एकर जागेवर मंगळ ग्रह मंदिरासह माता काली, हनुमान, दुर्गा, नवदुर्गा, सोमेश्वर महादेव, बटुक भैरव, गणेश, शनिदेव, दत्त, शीतला माता, मनोकामना सिद्ध हनुमान, साईबाबा, मुंजोबा, गजानन महाराज अशा देवी-देवतांच्या छोट्या मंदिरांचेही निर्माण करण्यात आले आहे.
कत्तलखान्याविरोधात उभारला होता लढा
१५ वर्षांपूर्वी तपोवन परिसरातील जागेवर कत्तलखाना नियोजित होता. कामालाही सुरुवात होणार होती. कत्तलखान्यासंदर्भात नाशिक कुंभमेळ्यात आलेले सर्जुदास महाराज यांना जळगावातील नागरिकांकडून माहिती मिळाली. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले. निमखेडी रस्त्यालगतच्या जागेवर कत्तलखाना होऊ न देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढ्यात त्यांच्या दिगंबर आखाड्याचे संतही सहभागी झाले होते. त्या जागेवर हनुमान मंदिर उभारण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.