आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांत असतील आता वह्यांची काेरी पाने:चार विषयांच्या 25% अभ्यासक्रमावर हाेणार एक पुस्तक

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठ्यपुस्तके व वह्यांचे वाढते ओझे कमी‎ करण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकातच वह्यांची कोरी पाने‎ समाविष्ट करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने एकाच दिवसात संकेतस्थळावरून हटवला होता. त्याच निर्णयातून इयत्ता नववी व दहावी वगळून व दुसरीचा वर्ग जोडत सुधारित निर्णय बुधवारी पुन्हा जाहीर केला आहे. त्यानुसार, येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात एकच पुस्तक शाळेत घेऊन जाता येईल. एकाच पुस्तकात ४ विषय व प्रत्येक विषयानंतर कोरी पाने जोडली आहेत. राज्यातील सर्व शाळांत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठनिहाय वह्यांची पाने जोडलेली ४ भागातील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील. ही पाठ्यपुस्तके तयार करताना प्रत्येक विषयाचे ४ भाग केले जाणार आहे.

एकच पुस्तक न्यावे लागेल प्रत्येक सत्राला एक याप्रमाणे ४ सत्रांची ४ एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका वेळी एकच एकात्मिक पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत जावे लागेल. एक सत्र संपल्यानंतर हे पहिले एकात्मिक पाठ्यपुस्तक बाजूला ठेवून दुसरे एकात्मिक पाठ्यपुस्तक उपयोगात आणावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...