आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव शहरासह जिल्ह्यातील लहान मुलं आणि त्यांचे पालक कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. गेल्या काही महिन्यात हजारो बालक व पालक यांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलाय. महिन्याभरात ४३७ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून यात तीन बालिका गंभीर जखमी झाल्या आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात तिन्ही रुग्णांवर उपचार सुरु असून यात कुत्र्याने एकीच्या गालाचा लचका तोडला आहे तर दुसरीच्या डोक्यात कुत्र्याचे दोन दात घुसले आहे. या प्रकारांमुळे पालकांमध्ये भीती पसरली आहे. शहरासह ग्रामीण भागात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्याचा सर्वाधिक त्रास हा बालकांना सहन करावा लागत आहे. शहरातील शाहूनगर, आंबेडकर मटन मार्केट, तांबापुरा, समतानगर, सिंधी कॉलनी यांसह शहरातल्या विविध अशा सर्वच परिसरात मोकाट कुत्र्यांनी घराजवळ खेळणाऱ्या चिमुरड्यांचे लचके तोडले असल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच गेल्या चार दिवसात भडगाव, जामनेर, पाचोरा तालुक्यातील तीन बालिका गंभीर जखमी झाल्या आहे. मे महिन्यात ४३७ जणांना कुत्र्याने चावा घेतला असून यात सर्वाधिक २६८ पुरुषांचा समावेश आहे. नोकरीवरून परत जात असताना हे प्रकार अधिक घडत असल्याचे रुग्णांनी सांगितले. जखमींमध्ये ८० महिला, ८९ लहान बालकांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.