आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ऑनलाइन बिझनेसच्या नावाने महिलेची 3 लाखांची फसवणूक ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन बिझनेस करण्याच्या नावाने महिलेला कर्ज काढण्यास भाग पाडून चौघांनी तीची ३ लाख २८१ रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रमेश बाविस्कर (वय ४०, रा. खडकेचाळ, शिवाजीनगर) यांची फसवणूक झाली आहे. १ मे २०२१ रोजी राहुल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी महेश शिंपी या चौघांनी वैशाली यांची भेट घेतली. ऑनलाइन बिझनेसमध्ये जास्त फायद्याचे आमीष देऊन त्यांनी वैशाली यांच्या नावावर कर्ज काढण्यास भाग पाडले. नंतर कर्जाची रक्कम एका बँकेतून दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करण्याच्या बहाण्याने ऑनलाइन मिटींग घेतली. या मिटींगमध्ये वैशाली यांच्या मोबाइलवर आलेले ओटीपी विचारुन घेऊन तीन वेळा करुन ३ लाख २८१ रुपये परस्पर वर्ग करुन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वैशाली यांनी पैसे परत मागण्यासाठी तगादा लागला. या मुळे पल्लवी शिंपी हिने त्यांना मारहाण केली. तर इतरांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वैशाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र सोनार तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...