आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक निधीची कामे करण्यात शिंदे गटाचे 3 आमदार आघाडीवर:किशोर पाटील, चिमणराव, गुलाबरावांचा टॉप 5 मध्ये समावेश

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मतदार संघात आतापर्यंत सर्वाधिक निधी प्रस्तावित करण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार अनुक्रमे किशोर पाटील, चिमणराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत. भाजपचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे हे मतदार संघात सर्वाधिक कामे प्रस्तावित करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत आमदारांना 5 कोटींचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा सदस्य व एक विधान परिषद सदस्य आहेत. आमदार एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर निवडून आलेले तेरावे आमदार आहेत. त्यांना निधी देण्याबाबत अद्याप जिल्हा नियोजन समितीला पत्र प्राप्त झालेले नाही. त्यांच्या निधीचे नियोजन करण्यात आलेले नाही. बारा आमदारांसाठी 58 कोटी 33 लाख 28 हजार रुपयांचा निधी शासनाकडून अनुज्ञेय आहे.

27 कोटींची कामे प्रस्तावित

या आमदारांना एकूण 62 कोटी 93 लाख 47 हजार रुपयांचा निधीला मान्यतेसाठी वाव आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बारा आमदारांनी त्यांच्या मतदार संघात सर्वांनी मिळून 27 कोटी 42 लाख 13 हजार रुपयांनी कामे प्रस्तावित केले आहेत. सर्व आमदारांसाठी जिल्हा नियोजन समितीला प्रत्येकी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी एप्रिलमध्येच वितरित केलेला आहे. चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी कामांचा प्रस्ताव अद्याप दिलेला नाही.

यांनी केलीत एवढी कामे

जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी 2 कोटी 15 लाख 65 हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली. संजय सावकारे 80 लाख, चंद्रकांत पाटील 68 लाख, शिरीष चौधरी यांनी रावेर मतदार संघात 30 लाख रुपये निधीची कामे प्रस्तावित केलेली आहेत.

टॉप 5 आमदार

  • आमदार किशाेर पाटील- पाचोरा 8 कोटी 29 लाख
  • चिमणराव पाटील- एरंडोल 3 कोटी 20 लाख
  • सुरेश भोळे-जळगाव शहर 3 कोटी
  • गुलाबराव पाटील- जळगाव ग्रामीण 2 कोटी 41 लाख
  • मंगेश चव्हाण- चाळीसगाव 2 कोटी 25 लाख
बातम्या आणखी आहेत...