आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर युवासेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनिमित्त प्रथमच ९ ऑगस्टरोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
आदित्य ठाकरे राज्यभरात निष्ठा यात्रा करीत बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत. नेते सोडून गेल्यानंतर हतबल झालेल्या कार्यर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न करीत आहेत.शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तीन दिवसांपूर्वी मातोश्रीवर भेट घेतली घेतली होती. त्यानंतर आदित्य जळगावला येत आहेत. मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता जळगाव विमानतळावर त्यांचे आगमण होणार आहे. सकाळी ११.३० वाजता पाचोरा विधानसभा मतदार संघात संवाद साधणार साधणार आहेत. दुपारी १.४५ वाजता गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदार संघात संवाद साधणार आहेत.
बंडखोर आमदारांबाबत काय बोलणार ?
शिवसेनेची मुलुखमैदानी ताेफ अशी गुलाबराव पाटील यांची ओळख होती. नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना उद्देशून एक गुलाब गेला तरी काटेरी गुलाब दिसतील, असा इशारा दिलेला आहे. आदित्य त्यांच्याविषयी काय बोलतात, याविषयी उत्सूकता आहे. दुपारी ४.३० वाजता पारोळा येथे संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी तयारी करीत आहेत. रविवारी युवा सेनेची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.