आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिओच्या धर्तीवर श्वसन संस्थेची निगडित विषाणूमुळे होणारा गोवर हा संसर्गजनी आजार आहे. कोरोना काळात लसीकरणाची साखळी ब्रेक झाल्याने या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. लहान मुलांना हा आजार संसर्गातून होतो. त्यामुळे मुलाचा मृत्यू देखील होतो. साधारणतः हिवाळ्यात तसेच जानेवारी ते एप्रिल महिन्यात या आजाराचे रुग्ण आढळतात. याचे जंतू हवेत एक तास जिवंत राहू शकतात. गोवर प्रतिबंधासाठी ९ व्या महिन्यानंतर बाळाला ही लस दिली जाते. याद्वारे या आजारावर प्रतिबंध शक्य आहे. सध्या शहरात या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असून दररोज ओपीडीत २० ते ३० टक्के रुग्ण लक्षणे असलेले आढळून येत असल्याचे दिसते आहे.
एका बाल रुग्णापासून दुसऱ्या निरोगी बालकास श्वसन मार्गावाटे किंवा डोळ्यातील पांढऱ्या भागावाटे जंतू शरीरात प्रवेश करून गोवर होऊ शकतो. आजाराची लागण झाल्यावर चार दिवसांपर्यंत तो इतरांमध्ये पसरू शकतो. बाधित बालकाच्या संपर्कातील निरोगी व लसीकरण न झालेल्या साधारणपणे ९० टक्के मुलांना या आजाराचा धोका असतो.
...तर मेंदुज्वर हाेण्याचा धाेका
गोवरचे लक्षणे दिसताच मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्यामुळे दुसऱ्याला देखील संसर्ग होण्याची भीती असते. लक्षणे अधिक असल्यास डी. हायड्रेशन, न्यूमोनियासह मेंदूज्वर होण्याचा धोका असतो. म्हणून बालकाला रुग्णालयात भरती करणे योग्य ठरते. जेणेकरून इतरांना ससर्ग ठळेल.
- डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.