आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाशी लढा:जिल्ह्यात 30% विद्यार्थ्यांनी घेतली नाही लस; शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच व्हावी पडताळणी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरण सुरू मात्र पालक निरुत्साही, शाळांची साफसफाई सुरू

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने शिक्षण विभागांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ८०.२१ टक्के शालेय विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला असून, ६३.४० टक्के विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप सुमारे ३० टक्के विद्यार्थी लसीकरण विना असल्याची स्थिती आहे.

शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, रिक्षाचालक, व्हॅनचालक, पालकांचेही लसीकरणाचे किमान दोन डाेस पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळेची घंटा वाजण्यापूर्वी लसीकरणाची पडताळणी आवश्यक आहे. येत्या ८ जूनला केंद्रीय जिल्ह्यात ३० % विद्यार्थ्यांनी घेतली नाही लस; शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच व्हावी..

मंडळाच्या तर १३ जूनला राज्य मंडळाच्या शाळा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकवर्ग घटकातील लसीकरणाचे काम व पडताळणी पुढील सात दिवसांत करणे सहज शक्य आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यास मास्क, सोशल डिस्टन्सचे निर्बंध पाळून शाळा सुरू करणे उचित असल्याचेही जाणकारांनी सांगितले. शाळा सुरू होणार असल्याने शाळांची साफसफाई, दुरुस्तीचे कामही शाळा व्यवस्थापनाने हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागली असून, पुस्तके, गणवेशाची तयारी सुरू झाली असल्याचे चित्र आहे. शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही, याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल.

तसेच शिक्षण विभाग शाळांकरिता नवीन कोविड नियमावली जारी करणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. नियमावलीत सोशल डिस्टन्स, मास्कचे निर्बंध असणार असले तरी लसीकरणावर अधिक भर देणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, शिक्षक, शिक्षकेतर वर्गाचेही लसीकरण ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर रिक्षाचालकांनीही दोन्ही डोस घेतले असल्याचे वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...