आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वसनाचे विकार वाढले:वातावरणातील बदलासह धुळीमुळे न्यूमोनिया रुग्णांमध्ये 30 टक्के वाढ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणातील बदलासह शहरात प्रदूषण, धुळीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पंधरा दिवसात फ्ल्यू, टायफॉईड, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.शहरात धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहे.

लहान मुलांसह वृध्दांना सर्दी, खोकला व कफ होत असून महिन्याभर औषधी घेऊनही आजार बरा होताना दिसत नाही. अधिक कफ झाल्याने न्यूमोनियाचा धोका देखील वाढला असून १० टक्के रुग्ण न्यूमोनियाचे आढळून येत आहे. यात लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. सध्याचे बदलते वातावरण पाहता मास्क आणि गरम पाण्याची वाफ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आजारांना दूर ठेवता येईल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.

ओपीडीतील ५० टक्के बालके फ्लूने आजारी
सध्या वातावरणात गारठा निर्माण झाला असून ओपीडीत ५० टक्के बालके ही फ्ल्यू, न्यूमोनियाची आढळून येत आहे. यात ५ वर्षातील बालकांचा समावेश असून या बालकांना नियमित लसीकरण करणे आवश्यक आहे. यासोबतच सकस आहार महत्वाचा असल्याचे डॉ. अविनाश भोसले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...