आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात टळणार:एमआयडीसीतून शिरसाेली ‘बायपास’ने महामार्गावरील 30%वाहतूक घटणार

जळगाव / चरणसिंग पाटीलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीचा वाढलेला भार कमी हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुसावळसह एमआयडीसीतून शिरसाेलीकडे येण्या-जाण्यासाठी अडीच किलाेमीटर लांब आणि ३० मीटर रूंद बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या कामातील अडचण दूर झाली आहे. वाहतुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध झाल्यास शहरात जाण्याची इच्छा नसलेली २५ ते ३० टक्के वाहतुक परस्पर वळणार असून दहा किलाेमीटरचा फेरा टळेल. अर्थात, महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.

नगरपालिका असताना विस्तारीत आराखड्याला सन २००४मध्ये शासनाने मंजुरी दिली हाेती. त्यात झाेन क्रमांक सहा व सातमध्ये शिरसाेली रस्त्यावरील जकात नाकाच्या अलिकडच्या दिशेने

ईच्छादेवी, अजिंठा चाैकात हाेणारी वाहतूक काेंडी टळणार पाचाेऱ्याकडून भुसावळ जाण्यासाठी थेट शहरातून जावे लागते. मात्र, बायपासने एमआयडीसीतून नशिराबाद राेडला पाेहचू शकतील. ईच्छादेवी, अजिंठा, कालिंकामाता चाैकात काेंडी टळणार.

न्यायालयाने आदेश दिल्यामुळे मनपा शेतकऱ्यांना टीडीआर देवू शकेल. शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नसल्याने मनपाची आर्थिक काेंडी टळेल. शेतकऱ्यांना टीडीआरसाठी प्राेत्साहित केले जाणार आहे.

माेहाडी, आव्हाने, कुसंुबा, मन्यारखेडा ही गावे जळगाव शहराला जाेडली गेली आहेत. त्यामुळे आता शिरसाेली रस्ता अर्थात मेहरूण तलावाच्या बाजुने बांधकामे वाढली आहेत. भविष्यात ती वाढतील.

सध्या असे जावे लागते आैरंगाबाद महामार्गाने एमआयडीसीतून शिरसाेली रस्त्याला जाण्यासाठी वाहनधाकांना ईच्छादेवी चाैकातून अजिंठा चाैकामार्गे एमआयडीसीत आणि पुढे विमानतळाकडे जावे लागते.

वाहने पर्यायी मार्गाने एका सर्वेक्षणानुसार पाचाेरा ते जळगाव ११०४६ वाहने तर पाचाेरा चाळीसगाव दरम्यान ६६८८ वाहने धावतात. ११०४६ वाहनांपैकी सर्व वाहने शहरातून येत नाहीत. परंतु, ६० टक्के वाहने जळगावात येत असले तरी त्यापैकी किमान दाेन हजार वाहने पर्यायी मार्गाने धावतील.

बातम्या आणखी आहेत...