आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची 31,472 पदे रिक्त; आरटीईच्या सर्वेक्षणातून समाेर आली माहिती

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांसह वंचित घटकांतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, राज्यात जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या शाळांमधील ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती आरटीईच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर विद्यार्थी शिकणार तरी कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक अनिवार्य आहे. या नियमाच्या आधारानुसार सध्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत. गेल्या १० ते १२ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित खासगी शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत ३१ हजार ५७२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अनुदानित खासगी शाळांमध्ये २५ हजार जागा रिक्त आहेत. तिजोरीतील पैसा वाचवण्यासाठी आणि कायम विनाअनुदानित शाळांना फायदा पोहचवण्यासाठी शिक्षकांची पदे रिक्त ठेवली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून केला जाताे आहे.

शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे जास्त
राज्यातील अनेक शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षक असल्याने त्यांना बहुवर्ग अध्यापन करावे लागते. त्यात शालेय पोषण आहार, बांधकामे, बीएलओ मतदार नोंदणी, वेळाेवेळी ऑनलाइन माहिती, बैठका, गाव-तालुका पातळीवर उपक्रम नव्याने सध्या शिक्षकांना ई-पीक पाहणी करणे, वाहतूक नियोजन करणे अशी कामे वाढत असल्याने शिक्षकांची मानसिकता बिघडत आहे,असे आरोप शिक्षक संघटना करताहेत.

मराठी, उर्दूची १८ हजार पदे रिक्त
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांत मराठी शाळांतील १६,७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १,३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची पदेही रिक्त आहेत. बहुतांश पदांवर गुरुजींचीच प्रभारी नियुक्ती करून कारभार सुरु आहे. परिणामी अध्ययनावर परिणाम होतो आहे.

बातम्या आणखी आहेत...