आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीएमएस कंपनीच्या जळगावच्या शाखा व्यवस्थापकाने 33 लाख 29 हजार 181 रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता गैरवापर केला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी या व्यवस्थापकास सोमवारी अटक केली. महेंद्र पांडूरंग झोंबाडे (वय 34, रा. चाकण, पुणे) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
नाशिक येथील सीएमएस नावाची कंपनीची शाखा आहे. जळगावच्या शाखेत 2018 मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून झोंबाडे हा काम पाहत होता. जळगाव शाखेचे कामकाज झोंबाडे कामकाज पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ यांनी सप्टेंबर 2019 मध्ये कंपनीच्या खात्याची तपासणी करत असतांना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी 33 लाख 29 हजार 181 रूपये खात्यात जमा न झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी झोंबाडे याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जळगावात येऊन तपासणी केली. यावेळी झोंबाडे याने फसवणूक, अपहार केल्याची कबुली दिली होती. लवकर सर्व पैसे परत करेल असे आश्वासन देवून स्टॅम्प पेपर आणि नोटरी देखील करून दिली. ठरलेल्या वेळेत पैसे परत न केल्यामुळे 6 फेब्रुवारी 2020 रोजी झोंबाडेच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेंव्हापासून तो बेपत्ता झाला होता. पोलिस निरीक्षक अरुण धनावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, गणेश निकम, फिरोज तडवी यांच्या पथकाने झोंबाडे याला पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.