आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात फळपिक विम्यासाठी बैठक:शेतकऱ्यांना 334 कोटी रूपयांची भरपाई मिळाली; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी येणार्‍या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती.

यात शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल 334 कोटी 70 लक्ष रूपयांची रक्कम जमा होणार असल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपातील ही रक्कम जमा झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्या बाबत निर्देश गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यासह हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी 375 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली असली तरी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप का मिळाली नाही ? याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी विचारणा केली होती. या अनुषंगाने, संबंधीत बैठकीत पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्या संदर्भात विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांना पाटील यांनी तंबी दिली होती.

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या अंतर्गत नुकसान भरपाईच्या स्वरूपात शेतकर्‍यांना 334 कोटी 70 लक्ष रूपयांची रक्कम ही शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या निवास स्थानी जावून मंत्री पाटील यांचा सत्कार केला

शेतकर्‍यांना मिळालेली नुकसान भरपाई
अमळनेर- 5 कोटी 98 लक्ष; भडगाव 2 कोटी 86 लक्ष रूपये; भुसावळ 4 कोटी 66 लक्ष; बोदवड 4 कोटी 87 लक्ष; चाळीसगाव 1 कोटी 02 लक्ष; चोपडा 42 कोटी 71 लक्ष; धरणगाव 6 कोटी 34 लक्ष; एरंडोल 3 कोटी 72 लक्ष; जळगाव 34 कोटी 82 लक्ष; जामनेर 100 कोटी 55 लक्ष; मुक्ताईनगर 39 कोटी 39 लक्ष; पाचोरा 2कोटी 98 लक्ष; पारोळा 92 लक्ष 96 हजार; रावेर 120 कोटी 92 लक्ष आणि यावल 63 कोटी 16 लक्ष रूपये.

बातम्या आणखी आहेत...