आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता:जळगाव जिल्ह्यातील 4285 कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एसटीचे 4285 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2018 पासून महागाई भत्त्याची रक्कम थकीत आहे. नुकतीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्क्यांनुसार महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची तीन कोटी पेक्षा अधिक रक्कम शासनाकडे बाकी आहे. 34 टक्के महागाई भत्ता लागू झाला असला तरी संपूर्ण थकबाकी लवकर मिळावी अशी आशा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता देण्यात येतो. मात्र, आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता खूपच नगण्य होता. मात्र, नुकताच या एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने जाहीर केली.

या कर्मचाऱ्यांना जुलै 2016 मध्ये 2 टक्के, जानेवारी 2017 ला 4 टक्के, जुलै 2017 5 टक्के, जानेवारी 2018 ला 7 टक्के, ऑक्टोबर 2018 ला 9 टक्के, ऑक्टोबर 2019 ला 12 टक्के, ऑक्टोबर 2021 ला 21 टक्के तर नोव्हेंबर 2022 ला हा महागाई भत्ता 34 टक्के करण्यात आला. महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ जरी झाली असली तरी या कर्मचाऱ्यांची यातील फरकाची रक्कम तीन कोटीपेक्षा अधिक असल्याने ती राज्य सरकारने लवकर देण्याची गरज कर्मचाऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी कर्मचारी व आधिकारी यांचा महागाई भत्ता 2018 पासून प्रलंबित आहे. या बाबत इंटक संघटनेतर्फे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यावर चर्चा करून तो लवकर अदा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

- नरेंद्रसिंह राजपूत, इंटक संघटना राज्य कार्याध्यक्ष जळगाव

बातम्या आणखी आहेत...