आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शिक्षणाचा अधिकार योजना:आरटीई प्रतीक्षा यादीतील 346 प्रवेश निश्चित ; आज शेवटची मुदत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा यात समावेश आहे. 3 जून पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचे असून गुरुवारपर्यंत 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान शुक्रवारी प्रवेशाची अंतिम मुदत असून आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चिती केली.

तर प्रतीक्षा यादीतील 594 विद्यार्थ्यांपैकी 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी, सदर ॲलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून नजिकच्या गटसाधन केंद्र पंचायत समिती व शहरासाठी मनपा शिक्षण मंडळ कार्यालय येथे संपर्क साधून आपल्या बालकाचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेवून शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा. यासाठी शुक्रवारी शेवटची मुदत आहे.

बातम्या आणखी आहेत...