आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान टळले:कचऱ्याएेवजी दगड, माती, गाळ भरलेला 35 टन कचरा नाकारला

जळ​​​​​​​गाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दगड, माती अन् गाळ असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याची वस्तुस्थिती गुरुवारी केलेल्या अचानक तपासणीत समाेर आले. सहायक आयुक्तांसह आराेग्याधिकाऱ्यांनी ७० वाहनांची तपासणी केली. त्यात ३५ टन कचरा निकषानुसार नसल्याने रिजेक्ट करण्यात आला. यामुळे मनपाचे एका दिवसांत ३५ हजार रुपयांचे नुकसान टळले आहे.

शहरात सफाई करणाऱ्या वाॅटरग्रेस कंपनीतर्फे कचरा वाहतूक केली जाते. घंटागाड्यांमधील कचरा काॅम्पॅक्टर, डंपर व ट्रॅक्टरमध्ये भरून वजनकाट्यावर त्याची माेजणी हाेते. त्यानंतर थेट घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी डंपिंगसाठी रवाना हाेत असते. कचऱ्यात माेठ्या प्रमाणात माती, दगड, विटांचा समावेश असताे. मक्तेदार वजन वाढवण्यासाठी कचऱ्याएेवजी मातीचा भरणा करीत असल्याच्या तक्रारी हाेत्या.

या संदर्भात नवनियुक्त सहायक आयुक्त उदय पाटील व आराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील यांनी गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत दाेन टप्प्यात वजनासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. ७० वाहनांची तपासणी केली. यात तीन डंपरमध्ये गवत, माती व दगडांचा समावेश हाेता. त्यामुळे डंपर परत केले. वाहनचालकांचा याची माहिती मिळाल्याने अनेक वाहने वजन माेजणीसाठी न येता परस्पर वळवण्यात आले.

महिन्याला दहा लाखांचे नुकसान
आराेग्य विभागाने तपासणीदरम्यान ३५ मेट्रिक टन कचरा मातीमिश्रित असल्याचे पकडले. यामुळे मक्तेदाराला मातीच्या बदल्यात मिळणारे ३५ हजार रुपये आता मिळणार नाहीत. विशेष म्हणजे दरराेज ३०० मेट्रिक टन कचऱ्याची नाेंद हाेती. तपासणी सुरू हाेताच कचऱ्याचा आकडा २६५ मेट्रिक टनावर पाेहाेचला आहे. ३० दिवस ३५ टन कचरा कमी झाल्यास मनपाचे महिन्याला १० लाख रुपये बचत हाेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...