आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत‎ 35 प्रशिक्षणार्थी सहभागी‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी. एम. फाउंडेशन व भवरलाल आणि ‎कांताबाई जैन फाउंडेशन तथा जननायक ‎थिएटर ग्रुपतर्फे अनुभूती स्कूलमध्ये‎ आठ दिवसीय नाट्य प्रशिक्षण‎ कार्यशाळा घेण्यात आली. यात ३५ ‎ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला.‎ मुख्य नाट्य प्रशिक्षक होनाजी‎ चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा ‎ ‎ झाली. यात थिएटर, योगा, एरोबिक्स, ‎ ‎ देहबोली, संवाद कौशल्य, लेखन,‎ दिग्दर्शन, पात्ररचना, प्रसंगनाट्य, रंग- ‎ ‎ वेशभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना,‎ पार्श्वसंगीत, निर्मिती प्रक्रिया, पद्मभूषण‎ हबीब तन्वीर, रतन थैयाम, इब्राहिम‎ अल्काजी या तीन मोठ्या नाट्य‎ कलाकारांच्या नाट्यशैलीबाबत‎ मार्गदर्शन करण्यात आले.

रविवारी या‎ कार्यशाळेचा समारोप झाला.‎ कार्यशाळेत जळगाव, वर्धा, औरंगाबाद‎‎ येथील निवडक ३५ प्रशिक्षणार्थींनी‎ सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणार्थींना‎ रंगकर्मी प्रा. हेमंत कुलकर्णी, रंगकर्मी‎ शंभू पाटील, डॉ. अमित पवार, ॲड.‎ प्रवीण पांडे, राज गुंगे, वैभव मावळे,‎ अमोल ठाकूर, चिंतामण पाटील, विनोद‎ ढगे, सोनल चौधरी यांनी विविध सत्रात‎ नाट्यकलेविषयी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...