आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:दूध संघाने संचालकांच्या कुटुंबीयांशी संबंधित 36 काेटींची बिले राेखली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघात आधीच्या संचालक मंडळाने २७ ऑक्टाेबर २०२२ रोजी बैठक घेऊन मंजुरी दिलेली ३६ काेटी रुपयांची बिले नवीन संचालक मंडळाने थांबवली आहेत. ही बहुतांश बिले ही आजी-माजी संचालकांच्या नातेवाईक, स्वकीयांशी संबंधित आहेत. २७ ऑक्टाेबरला झालेल्या बैठकीत ज्या विषयांना मंजुरी मिळाली होती, त्या बैठकीचे इतिवृत्त २४ डिसेंबरला झालेल्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले हाेते. या संचालक मंडळाने आधीच्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर केले तर त्या बिलांसाठी त्यांना जबाबदार धरले गेले असते. संचालकांच्या कुटुंबीयांची बिले काढल्याने नियमानुसार अपात्रता, जबाबदारी निश्चितीच्या अडचणी वाढू नये म्हणून नवीन संचालक मंडळाने सावध पवित्रा घेतला.

बैठक ठरवली अवैध आधीच्या संचालक मंडळाने ऑक्टाेबरमध्ये घेतलेल्या बैठकीला केवळ ९ संचालक हजर होते. दूध संघाच्या पाेटनियमाप्रमाणे २० पैकी किमान ११ संचालक काेरमपूर्तीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे ही बैठक बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत इतिवृत्त नामंजूर करण्यात आले.

अपात्रतेची धास्ती दूध संघात कुटुंबीय, नातेवाइकांच्या नावे कंत्राट घेणाऱ्या संचालकांची बिले थांबवण्यात आली आहेत. संचालकांनी त्यांच्या कुटुंबीयांचे किंवा नातेवाइकांच्या नावे दूध संघात कंत्राट घेणे हे कृत्य दूध संघाच्या पाेटनियमाप्रमाणे संचालकांच्या अपात्रतेसाठी कारणीभूत ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...