आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल:महिलेची 39 हजारांत ऑनलाइन फसवणूक ; फ्लिपकार्टमधून बोलत असल्याचे भासवून दिशाभूल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिपकार्टवरून मागवलेली वस्तू फुटलेली असल्यामुळे परत करण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला असता एका महिलेची ३९ हजार ५०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाली. ही घटना २ जून रोजी घडली. तर ४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तबस्सूमबी शेख जाहिद (रा. दंगलग्रस्त कॉलनी) यांची फसवणूक झाली आहे. शेख यांचा केक बनवण्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी फ्लिपकार्टवरून काचेच्या वस्तू मागवल्या होत्या. त्यांना २ जून रोजी वस्तू घरपोच मिळाल्या; परंतु काही वस्तू फुटलेल्या असल्याने त्यांनी परत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी फ्लिपकार्टच्या ६३७०८०६९२३ या कस्टमर केअर नंबरवर फोन केला. समोरील व्यक्तीने त्यांना ९८९३६१३६११ या क्रमांकावर फोन करण्याचे सुचवले. त्यानुसार शेख यांच्या मुलांनी फोन केला. यावेळी भामट्याने त्यांना सुमारे ४० मिनिटे बोलण्यात गुंतवून ठेवले. पैसे परत मिळवण्यासाठीची प्रक्रिया सांगत असताना एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. हे अॅप डाऊनलोड करताच शेख यांच्या मोबाइलचे संपूर्ण नियंत्रण भामट्याने ताब्यात घेतले. बँकेची माहिती घेतलेली असल्यामुळे ओटीपी नंबर मिळवून घेत शेख यांच्या खात्यातून ३९ हजार ५०० रुपये परस्पर वळवून घेतले.

बातम्या आणखी आहेत...