आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:चित्रकला स्पर्धेत 395 विद्यार्थ्यांचा सहभाग, पाणी बचतीचा दिला संदेश

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जैन इरिगेशन, गांधीतीर्थतर्फे आयोजन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन सिस्टिम्स, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे जागतिक जलदिनानिमित्त रविवारी महात्मा गांधी उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विविध शाळांतील ३९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद‌्घाटन अलफैज पिंजारी (अनुभूती स्कूल), विद्या बागुल (अनुभूती स्कूल), रितेश बागुल (ए . टी . झांबरे विद्यालय), दीपिका पाटील (श्रवण विकास मंदिर) या विद्यार्थ्यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला जलार्पण करून करण्यात आले.

जनसामान्यांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी जैन इरिगेशनतर्फे दरवर्षी पाण्याबाबत जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येतात. सकाळी ९ ते ११ दरम्यान पाणी या विषयावर निःशुल्क चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. या स्पर्धेसाठी दोन गट निश्चित करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स्, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन स्पोर्ट‌्स अकॅडमी येथील सहकाऱ्यांनी सहकार्य केले. आनंद पाटील, गिरीश कुलकर्णी आणि नितीन चोपडा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जलदिनी विजेत्यांचा गौरव, चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार
२२ मार्चला जलदिन आहे. याच दिवशी विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांना चित्रासाठी लागणारा कागद आयोजकांतर्फे पुरवण्यात आला होता. उपस्थित सर्व सहभागी स्पर्धकांना या वेळी जैन फार्मफ्रेशचे मँगो ज्यूस वितरित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...