आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याचा कट उधळला:चार जणांना पिस्तुलांसह अटक, नाशिक आयजींच्या पथकाची चोपडामध्ये कारवाई

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना नाशिक झोनच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, १७ राउंड व कार असा एकूण ७ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, १ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यातील आरोपींची चौकशी केली असता गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

रवींद्र खारगे, जिजाबा फाळके, चाँदपाशा शेख, जयश भुरुक, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व पुण्यातील रहिवासी आहेत. तर, मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला सतनामसिंग जुनैजा हा आरोपी फरार झाला आहे. तर, अन्य एका आरोपीची ओळख अद्याप पटली नसून तोही फरार आहे. या सहा आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 399, 402, 323, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोंगारे, चोपडा पोलिसांच्या पथकातील निरीक्षक अवतारसिंग चव्हाण चोपडा, उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, राकेश पाटील, प्रमोद पारधी, किरण धनगर, किरण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रे.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रे.
बातम्या आणखी आहेत...