आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:400 वर्षांच्या नोंदी, संकलनासाठी लागली 16 वर्षे; लोहार समाज वंशावळ प्रकाशित ; मनुदेवी येथे झाला कार्यक्रम

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वकर्मीय सुतार लोहार समाजातर्फे कुंवर परिवाराच्या वंशावळीचे प्रकाशन अडावद मनुदेवी क्षेत्रावर नुकतेच झाले. यानिमित्त नवचंडी यज्ञ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विपीन सुतार हे होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी किरण कुंवर, विभागीय अधिकारी संगीता पराते (नाशिक), नायब तहसीलदार रवींद्र मिस्तरी, लिलाधर लोहार, मनुदेवी ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम पाटील उपस्थित होते. कुटुंब प्रमुखांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वंशावळीत समाजातील ४०० वर्षापर्यंतच्या नोंदींचे संकलन करण्यात आले. यासाठी १६ वर्ष लागले असल्याची माहिती धनंजय लोहार यांनी दिली. नारायण कुंवर, भरत कुंवर, भास्कर कुंवर, सतीश कुंवर, धनंजय लोहार यांनी नियोजन केले. यावेळी राज्यभरासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गुजरातमधील समाजबांधव उपस्थित होते. विशाल कुंवर यांनी सूत्रसंचालन केले. नारायण कुंवर यांनी आभार मानले. यावेळी राज्यभरासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गुजरातमधील समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...