आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष माेहीम घेतली हाती:रेल्वेच्या एकाच दिवसामध्ये चार हजार केसेस, 23 लाख उत्पन्न

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेगाड्यांतून विनातिकीट व आरक्षण तिकीट नसताना जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माेहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार भुसावळ विभागात एकाच दिवसांत ८६ गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २३.२७ लाखांचा दंड वसुल करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनात भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभागाच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रेल्वेला २३.२७ लाख उपन्न मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...