आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-पीक पाहणी!:मुदत संपल्यानंतरही 40.51% क्षेत्रावरील नोंदी अपूर्ण; आता तलाठी करणार नोंद

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतीची नोंद करण्याची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या 59.49 टक्केच क्षेत्रावरील पीक पाहणीची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे.

सर्वात कमी 38.77 टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणीच्या नोंदी बोदवड तालुक्यात झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी नोंद करण्याचा कालावधी संपुष्टात आला असला तरी तलाठीस्तरावरील नोंदीचा कालावधीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत होती मुदत

ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून करण्यात येत आहे. सध्या खरीप हंगामाची पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणी चे 2.0.4 हे अद्ययावत व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. खरीप हंगामाची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल अ‍ॅपव्दारे करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. उशीराच्या मान्सुनमुळे काही शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्तांनी मोबाईल अ‍ॅपव्दारे शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा वाढवली होती. अंतीम मुदतवाढ दिल्यानंतरही जिल्ह्यातील 59.49 टक्के क्षेत्रावरील ई-पीक पाहणीची नोंद झालेली आहे.

पाहणी प्रलंबित कारण...

जिल्ह्यात एकूण पीक पाहणी खातेदार 3 लाख 45 हजार 318 एवढे असून पीक पाहणी क्षेत्र 4 लाख 98 हजार 29.28 हेक्टर एवढे आहे. या परिस्थितीमुळे फळपिक विमा काढण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद असणे बंधनकारक करण्यात आलेले नाही.ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याची परिस्थिती आहे. ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरुकता झालेली नाही. त्यातच पीक पाहणी नोंदवण्यासाठीची प्रक्रिया माहिती नसणे,मोबाईल हाताळता न येणे या कारणास्तव जिल्ह्यातील 40 टक्क्यांवर ई-पीक पाहणी प्रलंबीत आहे.

अशी आहे टक्केवारी

बोदवड 38.77, एरंडोल 44.14, भडगाव 51.53, जळगाव 52.43, धरणगाव 53.35, भुसावळ 55.15, जामनेर 59.15, पारोळा 59.33, अमळनेर 59.82, चाळीसगाव 59.84, पाचोरा 62.54, मुक्ताईनगर 63.87, यावल 66.42,चोपडा 70.90 व रावेर 81.49

बातम्या आणखी आहेत...